Tuesday, January 19, 2010

Born talent - is that a truth?

नमस्कार!
          अलीकडेच माझा एक मित्र गप्पा मारता मारता म्हणाला की, संगीताचा गंध आपल्या अंगी उपजतच असावा लागतो  (Born musician). गप्पांच्या ओघात या विषयावर जास्त बोलता आले नाही. पण मनात एक किन्तु घर करून राहिला. खरेच एखादी कला किंवा एखादा गुण उपजतच असू शकतो का? जगभरातील बऱ्याच मोठ्या संगीतकारांची (vocalists , instrumentalists) माहिती जेव्हा आपण वाचतो तेव्हा लक्षात येते की त्या सर्वांनी आपापली कला शिकण्यासाठी फार फार लहानपणीच सुरुवात केलेली होती.  अशी बरीच मंडळी आहेत की जी लहान वयातच फार प्रसिद्ध झाली आहेत - ह्या सर्व गोष्टी "संगीतकार जनामालाच यावा लागतो" किंवा "कलाकार जन्मालाच यावा लागतो " ह्या उक्त्या सार्थ करण्यासाठी कितपत समर्थ आहेत???
          वैयाक्तिकली, माझे मत ह्या सर्वांच्या अगदी ठाम विरुद्ध आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे त्यांच्या एक भाषणात म्हणतात - "तानसेन जन्मालाच यावा लागतो ह्यापेक्षा तानसेन घडावा अशी परिस्थिति निर्माण व्हावी लागते...". आणि मी त्यांच्या ह्या वाक्याशी पूर्णपणे सहमत आहे.
          कुठचिही कला आपल्याला आत्मसात करण्यासाठी ती लहान वयात शिकणे हे जितके कमी महत्वाचे आहे, तितकेच जास्त महत्वाचे हे आहे की आपण ती कला किती जिद्दीने आणि चिकाटीने शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. योग्य मार्गदर्शन, प्रबळ इच्छाशक्ति, सातत्य, संयम आणि आत्म विश्वास यांच्या जोरावर तुम्ही पन्नाशीत सुद्धा एखादी कला आत्मसात करू शकता.
          यात दुमत अजिबात नाही की, लहान वयात आपली शिकण्याची क्षमता जास्त प्रभावी असते. परन्तु तीव्र इच्छाशक्ति ही शारीरिक क्षमतान्वर केव्हाही मात करू शकते ही गोष्ट तितकीच खरी!

तुमचा,
संदीप खांदेवाले

Thursday, October 15, 2009

Happy Diwali

नमस्कार,


दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 


अज्ञानाचा अंधार दूर होऊन दाही दिशा प्रकाशाने न्हाऊ देत, हीच प्रार्थना!


तुमचा,
संदीप खांदेवाले


Wednesday, October 7, 2009

Introduction

नमस्कार मंडळी

हा माझा पहिला-वहिला ब्लॉग आहे।

वाचल्याबद्दल धन्यवाद!

तुमचा,
संदीप खांदेवाले